कोण होणार बिग बॉस मराठी ३ चा विजेता

        कलर्स मराठी वरील गाजलेली मालिका बिग बॉस मराठी आता तिच्या अंतिम चरणात आली आहे. रविवारच्या भागात महेश मांजरेकरांनी सांगितल्या प्रमाणे गेला आठवडा नो एलिमिनेशन म्हणून पार पडला, पण यांनतर मात्र येणाऱ्या पुढच्या आठवढ्या मध्ये डबल  एलिमिनेशन होणार आहे. आणि लवकरच या सिजनचा ग्रँड फिनाले सुद्धा पार पडणार आहे.

          बिग बॉस मराठी चे हे तिसरे पर्व असून आधीच्या दोन पर्वा पेक्षा हे पर्व खूप चांगल्या पद्धतीने गाजले आहे. गेल्या ७५ दिवसांतबिग बॉसच्या घरात अनेक राडे झाले, अनेक टास्क रंगले, अनेक स्पर्धकांचे शेवटपर्यंत टिकायचे स्वप्न सुद्धा भंगले, अनेक नवीन ग्रुप तयार झाले तर आधीचे असणारे ग्रुप तुटले सुद्धा याच मुळे कि काय हा सिजन खूप चांगल्या पद्धतीने गाजला. आता लवकरच या सिजनचा ग्रँड फिनाले सोहळा जवळ येत आहे. बिग बोस मराठी सिजन ३ चा ग्रँड फिनाले सोहळा येत्या २६ डिसेंबर ला आपल्याला बघायला मिळणार आहे आणि याच वेळी समजेल कि बिग बॉसच्या ट्रॉफी वर कोणाचे नाव कोरले जाईल. सध्या घरात जय दुधाने, विकास पाटील, विशाल निकम, मीनल शहा, गायत्री दातार, सोनाली पाटील, उत्कर्ष शिंदे आणि मीरा जग्गनाथ हे स्पर्धक उरले असून सारेच स्पर्धक एकापेक्षा एक आहेत. आणि म्हणूनच यावेळी कोण बाजी मारले हे सांगणे कठीण आहे.

         बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये मेघा धाडे, दुसऱ्या पर्वामध्ये शिव ठाकरे यांनी बाजी मारली होती. आता यावेळी तिसऱ्या सिजनमध्ये कोण बाजी मारेल हे बघणे मजेशीर असणार आहे. 

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट