Breaking News
वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री सायली संजीवची भावनिक साद
काहे दिया परदेस पासून सगळ्यांच्या मानत घर करणारी गोड अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. नुकतंच सायली संजीव हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बाबांचे काही फोटो शेअर करत एक भावनिक लिहिली आहे. ज्यामध्ये तिचे बाबा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची बातमी तिने सगळ्यांना दिली. पण गेल्याच महिन्यात त्यांची प्रकृती अजून खालावल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले अशी दुखद बातमी तिने तिच्या चाहत्यांना दिली.
अभिनेत्री सायली संजीवला तिचे बाबा खूपच जवळचे असे होते, तिच्या प्रत्येक कामाच श्रेय ती तिच्या बाबांना देत असते. आणि म्हणूनच कि काय तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर पोस्ट सायलीने शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने “संजीव २६/०७/१९५८ – ३०/११/२०२१. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं.” या शब्दात बाबांवरचे प्रेम जाहीर केले आहे. सायलीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी तिला धीर देत तिचं सांत्वन केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant