गरोदर मातांनी अशी वाढवा प्रतिकार शक्ती
आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम प्रणालीची आवश्यकता असते. ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा व्यक्तींना आजारांची लागण पटकन होते. गरोदर मातांना आजारांचा सामना करावा लागू नये याकरिता रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे अधिक गरजेचे आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काही खास गोष्टींचे पालन केल्यास प्रतिकारशक्ती नक्कीच वाढविता येऊ शकते. गरोदर मातांना सर्दी, खोकला, ताप आणि संसर्गजन्य आजार चटकन बळावतात. याकरिता मुळातच रोग प्रतिकारकशक्ती बळकट करणे आवश्यक आहे. याकरिता खालील उपायांचा अवलंब केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.
शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल राखा ः शरीर हायड्रेटेड ठेवणे अधिक गरजेचे आहे. हिवाळ्यामध्ये तहान लागत नसल्याने पाण्याचे पुरेसे सेवन केले जात नाही परिणामी शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तसेच शरीरातील टॉक्सीन बाहेर काढले जात नाही. त्यामुळे आजारांचा सामना करावा लागू शकतो.
रोग प्रतिकारकशक्ती वाढविणार्या पदार्थांचा आहारात समावेश करा ः काही खाद्यपदार्थ असे आहेत जे आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. आपला आहार जीवनसत्व, खनिज, प्रथिने आणि इतर पोषक तत्त्व तसेच पोटॅशियम आणि व्हिटॅमिन डी ने परिपुर्ण अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असलेला असावा. शर्करायुक्त पेयांचे सेवन टाळा. त्याऐवजी तुम्ही पौष्टिक सूप, उकडलेल्या भाज्या आणि फळ, भाज्यांचा रस पिऊ शकता.
लसीकरणाकडे लक्ष द्या ः गर्भवती महिलांनी वेळोवेळी लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे. फ्लु लसीकरणामुळे गर्भवती महिलांमधील रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. हे लसीकरण आई आणि बाळाकरिता अत्यंत सुरक्षित पर्याय आहे. याबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
थंड वातावरणात घराबाहेर फिरणे टाळा ः गरोदर मातांचे शरीर अतिशय संवेदनशील असते. आणि त्यामुळे वातावरणाचा यावर परिणाम होऊ शकतो. बाहेरील वातावरणामुळे जंतूंचा संसर्ग झाल्याने आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे अतिथंड वातावरणात घराबाहेर न पडणे अधिक योग्य ठरेल.
गरम कपडे परिधान करा ः थंड हवेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी गरम कपडे परिधान करा. शरीर सगळ्या बाजूंना झाकले जाईल याची काळजी घ्या. शरीराला उबदार ठेवा. त्यातकरिता लोकरीचे कपडे, हातमोजे, पायमोजे यांचा वापर करा.
व्यायामाला प्राधान्य द्या ः हिवाळ्यामधील थंड वातावरणामुळे सुस्तपणा जाणवू लागतो त्यामुळे स्वतःला नेहमी कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न करा. दररोज व्यायाम केल्यास शरीर तंदुरुस्त आणि लवचिक राहण्यास मदत होईल.
पुरेशी झोप घ्या ः गर्भवती मातांनी पुरेशी विश्रांती घ्यावी आणि यामुळे प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल कारण शरीर हे केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या बरेच देखील सक्रीय असते आणि त्यामुळे थकवा येतो. झोपेच्या वेळा पाळा आणि किमान 8 तास झोप घ्या.
- डॉ सुरभी सिध्दार्थ, स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ, मदरहुड हॉस्पीटल,खारघर
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Irfan Pathan
- जन्मदिन
- October 27
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya