छ. संभाजीनगरमध्ये भाजपनं विजयाचं खातं उघडलं, एकाच प्रभागातले 4 विजयी; MIM - शिंदेगटाचीही कडवी टक्कर
छ. संभाजीनगरमध्ये भाजपनं विजयाचं खातं उघडलं, एकाच प्रभागातले 4 विजयी; MIM - शिंदेगटाचीही कडवी टक्कर
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत भाजपने जोरदार मुसंडी मारत शहरातील सत्तेवर पहिली विजयाची मोहर उमटवली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे प्रमोद राठोड, सत्यभामा शिंदे, बाळासाहेब मुंडे, आणि सुरेखा गायकवाड यांचा समावेश आहे. महापालिकेच्या 115 जागांसाठी इथे सर्वच राजकीय पक्ष मैदानात असून संभाजीनगरच्या गडावर कोणाचा भगवा फडकणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. मुंबईत महायुतीने दमदार कामगिरी केली असून छ. संभाजीनगरमध्येही भाजपने (BJP) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 97 जागांवर निवडणूक लढवत असून शिवसेना शिंदे गट 92 जागी मैदानात आहे. ठाकरे यांची शिवसेना 97 जागांवर तर काँग्रेस 77, अजित पवारांची राष्ट्रवादी 77 आणि MIM 48 जागांवर निवडणूक लढवत आहे. येथील निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आतापर्यंत जाहीर झालेल्या 71 जागांच्या निकालांमध्ये भाजप 24 जागांवर आघाडीवर असून सत्ता स्थापनेच्या दिशेने पक्षाने ठोस पाऊल टाकल्याचे दिसत आहे. शिवसेना 18 जागांवर आघाडीवर असून काही पारंपरिक मतदारसंघांमध्ये पक्षाने आपली पकड कायम ठेवली आहे. उद्धव ठाकरे गटाला 7 जागांवर यश मिळवता आलं आहे. भाजपचा वाढत्या आघाडीमुळे शिवसेनेसाठी सत्तेचा मार्ग अधिक कठीण होत चालल्याचं राजकीय चित्र दिसतंय. दुसरीकडे एमआयएमने 15 जागांवर आघाडी घेत शहराच्या राजकारणात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. भाजप शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील ही तिहेरी लढत सत्ता स्थापनेसाठी निर्णायक ठरण्याची चिन्ह आहेत.
एकूण 115 जागांपैकी 71 जागांचे कल हाती आले आहेत. दरम्यान कांग्रेसला अद्याप एकही जागा मिळालेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलंय. वंचित बहुजन आघाडीने चार जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापनेच्या लढतीत खातं उघडलं आहे. तर अपक्षांना एक जागा मिळाली आहे. मतमोजणी अजूनही सुरू असून उर्वरित जागांचे निकाल येणे अजून बाकी आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade