एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 गडी राखून उडवला धुव्वा
एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 गडी राखून उडवला धुव्वा
कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 2026 या नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत दिमाखदार पद्धतीने केली. वडोदऱ्याच्या बीसीए (BCA) स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासोबतच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
डॅरिल मिचेलची झुंजार खेळी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत दमदार झाली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी रचली. या भागीदारी दरम्यान दोघांनीही प्रत्येकी 60 चेंडूमध्ये आपापले अर्धशतक पूर्ण केले. अखेर ही जोडी हर्षित राणाने फोडली. त्याने हेन्री निकोल्सला माघारी धाडले. निकोल्सने 8 चौकारांच्या मदतीने 69 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी केली. त्यानंतर हर्षितने डेव्हॉन कॉनवेलाही बाद करत न्यूझीलंडला दुहेरी धक्का दिला. कॉन्वेने 6 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने 67 चेंडूमध्ये 56 धावा केल्या.
28व्या षटकात मोहम्मद सिराजने विल यंगचा बळी घेतला. यंगच्या बॅटमधून केवळ 12 धावा निघाल्या. त्यानंतर 34व्या षटकात कुलदीप यादवने ग्लेन फिलिप्सला बाद केले. त्या क्षणी न्यूझीलंडचा स्कोर 170 धावांवर होता. 38व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने मिचेल हे याला बोल्ड केले, त्याने फक्त 18 धावा केल्या. सहावा विकेट 43व्या षटकात पडला, जेव्हा ब्रेसवेलला श्रेयस अय्यरने अचूक थ्रोवरून रनआउट केले. पुढच्याच षटकात सिराजने झॅक फोक्स/जॅकॅरीला बोल्ड करत न्यूझीलंडच्या अडचणी वाढवल्या. 48व्या षटकात न्यूझीलंडला सर्वात मोठा धक्का बसला, जेव्हा डॅरिल मिचेल 71 चेंडूमध्ये 84 धावांची शानदार खेळी करून बाद झाला. ज्यामुळे कीवी संघ 300 चा टप्पा ओलांडू शकला.
विराट कोहलीचं 'तुफान' अन् भारताचा विजय
न्यूझीलंडने दिलेल्या 301 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत दमदार झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सावध पण आत्मविश्वासपूर्ण खेळ करत डाव सावरला. रोहित लयीत दिसत होता; मात्र नवव्या षटकात तो आऊट झाला. रोहितच्या बॅटमधून 26 धावा निघाल्या, ज्यात दोन शानदार षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी डावाला वेग दिला. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली आणि या दरम्यान विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 28 हजार धावा पूर्ण करत एक महत्त्वाचा टप्पा गाठला. शुभमन गिलनेही अर्धशतक साथ दिली, मात्र 27व्या षटकात तो बाद झाला. गिलने 56 धावांची उपयुक्त खेळी केली.
शतकाच्या उंबरठ्यावर विराट कोहली OUT
त्यानंतर विराटला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर मैदानात आला. दोघांमध्ये 77 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. मात्र विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर असताना दुर्दैवाने बाद झाला. 40व्या षटकात कोहलीचा डाव संपला, त्याने 93 धावा करताना 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. यानंतर रवींद्र जडेजा स्वस्तात माघारी परतला, त्याच्या बॅटमधून केवळ 4 धावा निघाल्या. पुढच्याच षटकात श्रेयस अय्यरही 49 धावा करून बाद झाला. एकामागून एक पडलेल्या विकेट्समुळे सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकू लागला. मात्र याच क्षणी हर्षित राणाने 29धावांची धडाकेबाज खेळी करत भारताला पुन्हा सामन्यात परत आणले. अखेर केएल राहूलने टीम इंडियाचा विजय निश्चित केला, भारताने 6 गडी गमावून हे मोठे लक्ष्य पार केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant