महायुतीचा मुंबईकरांसाठी वचनामा जाहीर
महायुतीचा मुंबईकरांसाठी वचनामा जाहीर
पाणीपट्टीला स्थगिती ते बेस्टमध्ये 50 टक्के सवलतीसह अश्वासनांची खैरात
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मुंबईकरांसमोर आपली विकासाची दिशा स्पष्ट करत भव्य असा वचननामा जाहीर केला आहे. रोजच्या जीवनाशी थेट जोडलेल्या पाणी, घर, वाहतूक, पर्यावरण, रोजगार आणि सांस्कृतिक अस्मितेच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत हा वचननामा तयार करण्यात आला आहे. तब्बल 2 लाख नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षा लक्षात घेऊन हा मांडण्यात आल्याचा दावा महायुतीकडून करण्यात आला आहे. मुंबईच्या भविष्यासाठी हा वचननामा निर्णायक ठरेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये झोपडपट्टीमुक्त मुंबई, मोठ्या प्रमाणावर घरनिर्मिती, पाणीपट्टी वाढीला स्थगिती, बेस्ट सेवांमध्ये सवलत आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांचा समावेश आहे.
महायुतीच्या वचननाम्यात कोण-कोणती अश्वासनं?
-पर्यावरण आणि पूरनियंत्रण:
हवा प्रदूषण रोखण्यासाठी सर्वसमावेशक पर्यावरणीय धोरण राबवले जाणार
पर्यावरण संवर्धनासाठी 17,000 कोटी रुपये खर्चाची विशेष योजना
जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने मुंबईला पुढील 5 वर्षांत पूरमुक्त करण्याचा संकल्प
झिरो वेस्ट वॉर्ड संकल्पनेअंतर्गत प्रत्येक प्रभागात कचरा व्यवस्थापन
मुंबईतील सर्व रस्ते कचरामुक्त करण्यावर भर
झोपडपट्ट्यांमध्ये कचरा संकलनासाठी छोट्या वाहनांची व्यवस्था
- पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन:
संपूर्ण मुंबईला 24 तास पाणीपुरवठा
पुढील 5 वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगित, दरवर्षीची 8 टक्के वाढ रद्द
गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा प्रकल्प पुढील 5 वर्षांत पूर्ण करणार
निर्माणाधीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प वेळेत पूर्ण करणार
सांडपाणी वाहिन्यांचे आधुनिकीकरण
-रस्ते, वाहतूक आणि पार्किंग:
9 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या सर्व रस्त्यांचे काँक्रीटिकरण
काँक्रीट रस्ते वारंवार खोदले जाणार नाहीत यासाठी डक्ट प्रणाली
रस्ते खोदावी लागणाऱ्या 17 सेवा युटिलिटी टनेलमधून
खासगी ले-आऊटमधील रस्त्यांचे डांबरीकरण
सर्व फूटपाथ स्टँप्ड काँक्रीटचे
रस्त्यांवर कम्युनिटी पार्किंगची सुविधा
दुचाकी आणि रिक्षांसाठी स्वतंत्र पार्किंग
नवीन भुयारी आणि जमिनीवरील पार्किंग स्थळांची उभारणी
रस्त्यांबाबत माहिती देण्यासाठी डिजिटल फलक
-बेस्ट आणि सार्वजनिक वाहतूक:
बेस्ट बसमध्ये महिलांना 50 टक्के भाडे सवलत
2029 पर्यंत बेस्टचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक
बेस्ट बसची संख्या 5,000 वरून 10,000 पर्यंत वाढवणार
--
नागरी सुविधा आणि स्वच्छता:
सर्व मोकळ्या जागांची देखभाल थेट महापालिकेकडून
“मागेल त्याला शौचालय” धोरण प्रभावीपणे राबवणार
अतिरिक्त कामगार भरती करून सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणार
--
बाजारपेठ, रोजगार आणि उद्योग:
बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज
सर्व भाजी मंडईंचे नुतनीकरण आणि पुनर्विकास
फिश इम्पोर्ट–एक्सपोर्ट सेंटरची स्थापना
लघु उद्योग धोरण राबवणार
स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर उभारणार
लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज
पुनर्विकास आणि शहर नियोजन
पुनर्विकास प्रकल्पांना जलदगती
पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनसंबंधी योजना वेगाने राबवणार
पात्र फेरिवाल्यांचे हॉकिंग झोन्समध्ये पुनर्वसन
विकसित मुंबईसाठी 2034 चा दीर्घकालीन विकास आराखडा
--
भाषा, संस्कृती आणि पर्यटन:
महापालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना
मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकांची उभारणी
बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आणि आर्थिक तरतूद
पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र पर्यटन विभाग
हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचे संग्रहालय
रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर इतर नाट्यगृहांचा पुनर्विकास
गरज भासल्यास 3 नवीन नाट्यगृहे उभारणार
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade