पृथ्वीचा निळा रंग होतोय फिकट
पृथ्वीचा निळा रंग होतोय फिकट
पृथ्वीच्या उदयाचे विल्यम अँडर्स यांनी अंतराळातून टिपलेले छायाचित्र १९६८ साली खूप गाजले. तर अपोलो १७ मिशनमध्ये हॅरिसन स्मिथने अंतराळातून टिपलेले निळ्याशार पृथ्वीचे छायाचित्र तर अजरामर झाले. त्यात निळाशार महासागराचा भाग व्यवस्थित पाहाता येतो. त्या छायाचित्राला ‘ब्लू मार्बल’ असेही म्हटले जाते. अंतराळातून पृथ्वी आजही तशीच निळी दिसते, असे अलीकडेच अंतराळात जाऊन आलेले अंतराळवीरही सांगतात. हजारो वर्षे महासागरांचा हा निळेपणा तसाच टिकून आहे, असा आपला समज होता. पण आता उपग्रहांच्या नजरेतून दिसणारी एक वेगळीच, आणि काहीशी अस्वस्थ करणारी गोष्ट समोर येते आहे…, ती म्हणजे जगभरातील महासागरांचा रंग हळूहळू बदलतो आहे!
महासागर गडद निळे दिसले, तर तिथे पोषकद्रव्ये आणि प्लँक्टन कमी असतात. हिरवट रंग अधिक दिसू लागला, तर तिथे प्लँक्टनची घनता वाढलेली असते. त्यामुळे महासागरांचा रंग बदलतोय, याचा अर्थ महासागरातील जैविक रचना बदलते आहे.
महासागरांचा हा रंग ठरतो तो प्रामुख्याने अतिसूक्ष्म सजीवांमुळे अर्थात फायटोप्लँक्टनमुळे. हे सूक्ष्म वनस्पतीसदृश जीव सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने अन्ननिर्मिती करतात आणि संपूर्ण सागरी अन्नसाखळीचा पाया तेच रचतात. हेच जीव पृथ्वीवरील जवळपास ५० टक्के ऑक्सिजन निर्माण करतात, हे आपल्याला फारसे ठाऊकही नसते.
महासागरातील उष्णता वाढते आहे. उष्ण पृष्ठभागामुळे खोल समुद्रातील पोषकद्रव्ये वर येण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी, उष्ण कटिबंधातील अनेक भागांत प्लँक्टनचे प्रमाण घटत आहे. काही ठिकाणी प्लँक्टन पूर्णपणे नाहीसे होत नसले, तरी त्यांचे प्रकार बदलत आहेत म्हणजेच मोठ्या, कार्यक्षम प्रजातींची जागा लहान, कमी प्रभावी प्रजाती घेत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर