Breaking News
मुंबई महानगरात तुफान पाऊस, रेल्वे – विमानसेवा कोलमडली
मुंबई. दि. १९ : मोनोरेलमध्ये अडकले प्रवासी - चेंबूर ते भक्ती पार्क धावत असताना मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि मोनोरेल जागीच थांबली. सुमारे सव्वा तासांनंतर या मोनोरेलमधून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. या दरम्यान, अनेकांचा जीव गुदमरला, अनेकांचा जीव टांगणीला लागला. त्यामध्ये भीतीने गांगलेल्या प्रवाशांनी हात जोडल्याचे दिसून आले तर एका प्रवाशाने काच फोडून मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं.
चेंबूर ते भक्ती पार्क अशा धावणाऱ्या मोनोरेलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि ही ट्रेन जागीच थांबली. मोनोरेल एसी असल्याने दरवाजे बंद होते. मोनोरेल बंद झाल्यानंतर आधी आतील एसी बंद पडला. त्यामुळे आतील प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास सुरू झाला.
व्हेंटिलेशन सिंस्टिम बंद पडल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यातच हळूहळू आतील लाईटही बंद पडली आणि अंधार झाला. त्यामुळे या प्रवाशांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण निर्माण झालं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar