Breaking News
या राज्यात सापडला सोन्याचा मोठा साठा
भुवनेश्वर - ओडिशातील देवगड (आदासा-रामपल्ली), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट या ठिकाणी सोन्याचे साठे आढळले आहेत. तसेच मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध येथे सोन्याचे साठे शोधण्याचे काम सुरु आहेत. या खाणींचा भारताला मोठा फायदा होणार आहे. 2020 पर्यंत देशात दरवर्षी फक्त 1.6 टन सोन्याचे उत्पादन होत होते. आता ओडिशामध्ये सापडलेले सोन्याचे साठ्यामुळे येत्या काळात सोन्याच्या आयातीत काहीशी घट होऊ शकते.
भूगर्भीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार या भागात 10 ते 20 मेट्रिक टन सोने असू शकते. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. मात्र हा आकडा भारत आयात करत असलेल्या सोन्यापेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी भारताने सुमारे 700-800 मेट्रिक टन सोनं आयात केलं होतं.
ओडिशा सरकार, ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन (OMC) आणि GSI या सोन्याचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देवगडमधील पहिल्या सोन्याच्या खाणीच्या ब्लॉकचा लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या महसूलाला फायदा होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade