Breaking News
कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ…
सांगली - सांगली जिल्ह्यात सर्वदूर हलक्या सरी पडत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
वारणा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळ जलाशय परिचलन सूची प्रमाण धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून वक्र द्वारा द्वारे 10,000 क्युसेक आणि विद्युत गृहातून 1630 असा एकूण 11,630 क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळ नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कृष्णा व वारणा संगम
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळ धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फुटांवरून ५ फुटापर्यंत उघडून ३३,००० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ३५,१०० क्युसेक विसर्ग सुरू होईल.
त्यामुळ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे