Breaking News
हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल यांची निवड
पुणे -हिंदू समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि संघटनबांधणीसाठी अखंड कार्यरत असलेल्या हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी पुण्याचे कोहिनूर, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ही निवड समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत करण्यात आली. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास समितीचे अखिल भारतीय संयोजक गुणवंतसिंग कोठारी आणि पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
महामंत्री किशोर येनपुरे यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. त्यानुसार –
उपाध्यक्ष: पंडित शिवकुमार शास्त्री
संयोजक: किशोर येनपुरे
सहसंयोजक: अॅड. संदीप सारडा
मठ-मंदिर उपाध्यक्ष: संजय भोसले
प्रशासकीय संस्था उपाध्यक्ष: सीए राधेश्याम अगरवाल, चरणजीतसिंग सहानी
कार्यालय प्रमुख: योगेश भोसले
कोषाध्यक्ष (कॉर्पोरेट): नितीन पाटणकर, संजय गांधी, नितीन पैलवान, गुरुबक्षसिंह मखेजा
कोष कॉर्पोरेट मार्गदर्शक: प्रल्हाद राठी
दस्तावेजीकरण: प्रकाश ढगे, उदय कुलकर्णी
जाती समूह प्रमुख: सिद्धेश कांबळे, राजन बाबू
प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क: सीए डॉ. केतन जोगळेकर, कुंदन साठे, संतोष डिंबळे, सीए सुनील सुरतवाला, राजेश मेहता
महिला सहभागाला प्राधान्य देत मातृशक्ती विभागाची जबाबदारी अॅड. कीर्ती कोल्हटकर, अनुपमा दरक, विद्या घाणेकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर मार्गदर्शक मंडळात महेश सूर्यवंशी, राजेंद्र भाटिया, सुभाष परमार, सुनंदा राठी यांची निवड झाली आहे.
एकूण ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या नव्या कार्यकारिणीमुळे समितीच्या कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे