Breaking News
दहावी-बारावीनंतर काय? विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे आयोजन
दहावी आणि बारावी नंतर विद्यार्थ्यांना पुढील करिअर ठरवण्यासाठी असंख्य मार्ग ऊपलब्ध आहेत पण ते माहित नसल्यामुळे सुयोग्य असा ऑप्शन कोणता? त्याचे नियोजन विद्यार्थी आणि पालकांना करता यावे म्हणून अभ्युदय एज्युकेशन शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा फणसेकर यांनी अरिहंत चे करियर गायडन्स तज्ञ भारती शाह आणि सुशील चव्हाण यांना निमंत्रित केले होते.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पडद्यावर विविध तक्त्यांच्या सहाय्याने अनेक महत्वाच्या उपलब्ध संधी कुठे आहेत त्यासाठी कोणत्या परीक्षा द्यायच्या कोणत्या शिक्षण संस्था त्यासाठी प्रशिक्षण देतात, आयआयटी,एनडीए,सारख्या संस्था, एआय, रोबो डेटा सायन्स आर्किटेक्ट इंजिनीयर मर्चंट नेव्ही,देशासाठी एमबीबीएस,आयुर्वेद,डेंटल, वेटरनरी , सीए अश्या विविध कोर्सेस ची माहिती देवून त्यासाठी काय तयारी करावी लागणार यांविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant