Breaking News
मुसळधार पावसाने कापूस पीक आडवे, शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या…
जालना :– जालन्याच्या सावंगी तलाव येथे मुसळधार पावसाने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जालना तालुक्यातील सावंगी तलाव मंडळातील बरडी या गावात मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे या भागातील कापूस पीक आडवे झाले आहे. बरडी येथील शेतकरी सुधाकर गंगातीवरे व प्रभू गंगातीवरे यांनी त्यांच्या एक हेक्टर क्षेत्रावर कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मात्र, या गावात मागील 2 दिवसांपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका त्यांच्या कापूस पिकला बसला आहे. मोठ्या मेहनतीने उगवलेले कापूस पीक मुसळधार पावसामुळे आडवे झाल्याने शेतकरी गंगातीवरे हे संकटात पडले आहेत. दरम्यान, या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर