Breaking News
गणेशोत्सवात परीक्षा घेऊ नका शिवसेनेने दिले निवेदन
मुंबई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबई क्र.१२ च्या वतीने महाप्रज्ञा पब्लिक स्कूल,दादी शेठ अग्यारी लेन येथे गणेशोत्सवाच्या काळामध्ये परीक्षा घेऊ नये याबाबत शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज मचाडो यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली. संपूर्ण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव अगदी जल्लोष साजरा करण्यात येतो. दक्षिण मुंबई ही उत्सवांची आणि गणेशोत्सवाचे माहेरघर आहे. या गणेशोत्सवामध्ये लहान मुले देखील मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. परंतु
दिनांक २८ व २९ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा आयोजित करण्यात आल्यामुळे पालकांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर, त्या तात्काळ रद्द करून गणेशोत्सवानंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
अनेक इंग्रजी शाळा तसेच काही माध्यमिक शाळा हे गणेशोत्सवाच्या काळामध्ये लहान मुलांच्या परीक्षा घेत असतात. ही बाब अत्यंत वेदनादायी असून अनेक पालकांच्या तक्रारी याबाबत आल्या होत्या. या तक्रारीवर आम्ही शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटून त्यांना रीतसर निवेदन दिले. तसेच त्यांना अग्रेसोसावामध्ये या परीक्षा घेऊ नये याबाबत विनंती केली. त्यावर या शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आम्ही परीक्षा घेणार नाही असे तोंडी कळवले असल्याची माहिती शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी दिली.
यावेळी शाखाप्रमुख संतोष घरत, मा शाखाप्रमुख अशोक देसाई आणि इतर शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर