गणेश चतुर्थीला अद्याप काही दिवस बाकी असले तरी लालबाग-परळ परिसरात गणेशोत्सवाचे जल्लोषपूर्व संकेत दिसून येत आहेत. 2 ऑगस्टपासूनच मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तींचे आगमन सुरू झाले असून, संपूर्ण परिसरात ढोल-ताशांच्या गजरात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील गणेशोत्सव नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतो. लालबागचा राजा, काळाचौकीचा महागणपती यांसारख्या प्रसिद्ध व भव्य गणेश मूर्तींचे आगमन झाल्याने हजारो गणेशभक्तांची गर्दी पहायला मिळत आहे.
रिपोर्टर
Karishma Sawant
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant