Breaking News
इंडसइंड बँक प्रीमियर लीगचा उत्साही समारोप
वसई शाखा विजेता, तर कांदिवली उपविजेता
मीरा भाईंदर- इंडसइंड बँक प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा मीरा भाईंदरमध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. बँकेतील कर्मचारी वर्गासाठी खास आयोजित केलेल्या या स्पर्धेने कामाच्या ताणातून थोडा विरंगुळा आणि टीम स्पिरीटला चालना दिली.
सदर स्पर्धेचे युट्युबवर थेट प्रक्षेपण (थ्ग्न एtrाaस्ग्हु) करण्यात आले होते, ज्यामुळे सहभागी खेळाडूंच्या उत्साहात भर पडली. मुंबईतील विविध शाखांतील ण्इअ विभागातील मॅनेजर्स आणि स्टाफ मेंबर्सनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला.
स्पर्धेच्या विजेत्या संघाचा बहुमान वसई शाखेला तर उपविजेता म्हणून कांदिवली शाखेला मिळाला. दोन्ही संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
याशिवाय, वैज्ञानिक कामगिरी करण्राया खेळाडूंना विशेष ट्रॉफीज देऊन सन्मानित करण्यात आले. फलंदाजी, गोलंदाजी, आणि क्षेत्ररक्षण या विविध विभागांतील उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले.
मुंबईतील सर्व मॅनेजर्सना सन्मानचिन्ह देऊन आभार व्यक्त करण्यात आले, ज्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि संपूर्ण स्पर्धेला प्रतिष्ठा मिळवून दिली. या स्पर्धेचे प्रमुख आयोजन ब्रांच मॅनेजर श्री. भरमा गोरूले आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन करून केले. महिनाभराच्या कामाच्या व्यापातून कर्मच्रायांना आनंद व ऊर्जादायी अनुभव मिळावा हा उद्देश त्यांनी अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade