Breaking News
देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पकडण्यासाठी ट्रम्पनी जाहीर केले 438 कोटींचे बक्षीस
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी इनामात दुप्पटीने वाढ केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांना अटक करण्याची माहिती देणाऱ्यास आता 50 मिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल 438 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली . मादुरोंना जगातील सर्वात मोठ ड्रग्स तस्कर मानण्यात आले आहे. त्यांनी अमेरिकेत फेंटानिल-मिश्रित कोकेनचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये लावलेल्या आरोपांनंतर आता हे इनाम दुप्पट करण्यात आले आहे. ऍटर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली मादुरो न्यायापासून वाचू शकणार नाहीत आणि त्यांना त्यांच्या अपराधांची शिक्षा मिळेल.’
मादुरो यांच्यावर 2020 मध्ये पहिल्यांदा आरोप करण्यात आले होते. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात न्यूयॉर्कच्या मॅनहटनमधील संघीय न्यायालयात नार्को-टेररिझम आणि कोकेन आयातीच्या षडयंत्राचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावेळी मादुरो यांच्यावर 15 मिलियन डॉलर्सचे इनाम ठेवण्यात आले होते. नंतर, माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या काळात ते वाढवून 25 मिलियन डॉलर्स केले. ओसामा बिन लादेन यांच्यावरही या रक्कमे एवढे इनाम ठेवले होते. मात्र आता ट्रम्प प्रशासनाने हे इनाम दुप्पटीने वाढवत 50 मिलियन डॉलर्स केले आहे. त्यामुळे ही रक्कम ओसामा बिन लादेनवर ठेवलेल्या इनामापेक्षा जास्त आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar