Breaking News
अमेरिका भारतावर लादणार ५० टक्के टॅरिफ
मुंबई - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ २५ टक्क्यांवरुन ५० टक्के करण्याचा निर्णय काल जाहीर केला. त्यामुळे भारताकडून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील कर वाढेल. यामुळे भारतीय मालाला अमेरिकेत असलेली मागणी कमी होईल. टॅरिफमुळे वस्तू महाग होतील. त्याचा थेट फटका मागणीला बसेल. यामुळे अमेरिकेला निर्यात करणाऱ्या कंपन्यांचा नफा आटेल. त्यासोबतच याचा थेट फटका सर्वसामान्य भारतीय ग्राहकांना आणि कामगार वर्गाला बसेल.
वॉशिंग्टनमधील दक्षिण आशिया आणि परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ असलेल्या मायकल कुगेलमन यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफबद्दल घोषणांचं विश्लेषण केलं. ‘भारतीय वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावून ते ५० टक्क्यांवर नेण्याचा निर्णय दोन देशांमधील संबंध बिघडवणारा आहे. भारतानं एक ठाम आणि स्वतंत्र भूमिका घेतली. भारताचा ठाम पवित्रा ट्रम्प यांना त्यांचा अपमान वाटला. त्यामुळेच त्यांनी भारतावर टॅरिफच्या लादून बदला घेतला,’ असं विश्लेषण कुगेलमन यांनी केलं.
दरम्यान देशातील शेतकरी, मच्छिमार आणि पशुपालकांच्या हिताशी भारत कदापि तडजोड करणार नाही. त्यासाठी कितीही किंमत चुकती करावी लागली तरी आम्ही डगमगणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (. Prime Minister Narendra Modi)यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (U.S. President Donald Trump.) यांनी नुकत्याच भारतावर लादलेल्या आयातशुल्कावर (tariffs)आपली ठाम भूमिका मांडली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar