अमली पदार्थ सेवन विरोधी जनजागृतीसाठी अभ्युदय एज्युकेशन शाळेतील किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या विषयावर बोलताना काळाचौकी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदीश शेलकर यांनी अनेक घटनांचा दाखला देत विद्यार्थ्यांना सावध केले अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने जीवन कसे दुःखदायक ठरते याची माहिती दिली तसेच ते म्हणाले आयुष्यात लाकूडतोड्याची गोष्ट लक्षात ठेवून प्रामाणिकपणा जपा. मुलींवरील वाढते अत्याचार लक्षात घेता मुलींनी विशेष करून काळजी घेतली पाहिजे मोबाईलचा वापर सावधपणे आणि सतर्कपणे केला पाहिजे अन्यथा पश्चातापाची वेळ येऊ शकते
रंगीत फुग्यांचे उदाहरण देत ते म्हणाले फुगा काळा आहे की रंगीत आहे यावर तो उडत नसतो तर तो हवेच्या दाबावर उडतो आणि म्हणून जीवनात जगण्यासाठी पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास हवा
तसेच वाहन चालवताना सुद्धा जे नियम आहेत उदाहरणार्थ हेल्मेट वापरणे दारू पिऊन वाहन चालवू नये वेफिकीरपणे वाहन चालवू नये हे नियम आपल्या हितासाठीच आहेत त्याचे पालन केले नाही तर आपल्याला दंड तर होईलच पण जीविताची हानी सुद्धा होऊ शकते. म्हणून काळजी घ्या नियम पाळा.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा फणसेकर तसेच काळाचौकी पोलीस ठाण्याचे एएसआय विलास शिंदे महिला पोलीस हवालदार रंजना लिलके, महेंद्र भोई उपस्थित होते
रिपोर्टर
Karishma Sawant
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant