Breaking News
नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण
मुंबई - जगभरात भारतीय लोकनृत्यांची ओळख निर्माण करण्राया नृत्येश्वर या मुंबईतील संस्थेने तैवानमध्ये भरविण्यात आलेल्या “चिल्ड्रन्स इंटरनॅशनल फोल्कलोर अँड फोक गेम फेस्टिवल'' या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय महोत्सवात भाग घेतला आणि भारतीय संस्कृतीचा झंझावात तिथे निर्माण केला.
1989 सालापासून कार्यरत असलेल्या नृत्येश्वर संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. शशिकांत मेस्त्राr यांनी आपल्या संपूर्ण जीवनात भारतीय कला, संस्कृती आणि लोकनृत्य जपण्याचे आणि त्याचा प्रसार करण्याचे कार्य केले आहे. मागील 33 वर्षांपासून ही संस्था सातत्याने विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
यावर्षी तैवान सरकारतर्फे आयोजित महोत्सवात मुंबईतील शिशुवन स्कूल, गोपी बिर्ला स्कूल, बाई अवाबाई एफ. पेटिट गर्ल्स हायस्कूल आणि जे. बी. वच्छा गर्ल्स स्कूल येथील 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी कोळी, वाघ्या मुरळी, भांगडा, दांडीया आणि काळबेलिया अशा विविध पारंपरिक भारतीय लोकनृत्यांची बहारदार सादरीकरण केली.
तेथील प्रेक्षकांनी या नृत्यांना टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली. तैवान सरकारच्या वतीने उपस्थित मंत्री महोदयांनी नृत्येश्वर संस्थेला विशेष ट्रॉफी प्रदान केली. संस्थेच्या वतीने त्यांना नटराज मूर्ती आणि भारताचा तिरंगा भेट देण्यात आला.
कार्यक्रमानंतर भारताचे तैवानमधील सांस्कृतिक खात्याचे प्रमुख आणि प्रतिनिधींनी नृत्येश्वरच्या चमूला भेटीस बोलावले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये कोरिओग्राफर शशिन मेस्त्राr, सहाय्यक व व्यवस्थापक सिद्धेश मेस्त्राr, सहाय्यक जिनल गाला आणि गायिका अक्षया मेस्त्राr, मान्या गडा, आयना जयकर यांचे विशेष योगदान होते.
या चमूत फ्रेया, अनन्या, सायवी, हिर, विहा, दिक्षिता, रेवा, मान्या, दिविशा, क्रिशा, अरिहा, उशमी, प्रिशा, रीवा, अयाना, हृदान, आर्यन, श्लोक, पलाश, पार्शवी, अब्दुल आणि योगेश मोरे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade