Breaking News
सरकारी कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई - शिवसेना शाखा क्र. २१२ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या सहकार्याने मुंबई सेंट्रल येथे सरकारी कार्ड शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरात पॅन कार्ड, आधार कार्ड, ई श्रम कार्ड, रेशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, उद्यम आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, निवडणूक कार्ड याअशा अनेक योजनांचा समावेश होता हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला अध्यक्ष व शिवसेना महिला शाखाप्रमुख सौ. स्मिता साळवी यांनीविशेषपरिश्रमघेतले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्री. शामराव मोहिते, मुंबई उपाध्यक्ष श्री. संतोष साळवी, मुंबई सेक्रेटरी श्री. भालचंद्र धुरी ,मुंबई सेक्रेटरी श्री. सुजय पाटील, मुंबई कोषाध्यक्ष श्री. प्रकाश म्हाबदी, दक्षिण मुंबई सेक्रेटरी श्री. जगदीश नलावडे, राजेश भगत व शिवसेना शाखाप्रमुख श्री. सुनील डोंगरे तसेच सतीश जाधव आणि महिला आघाडी यांनी मोलाचे सहकार्य केले त्या शिबिरास भेट देण्याकरिता शिवसेना उपविभागप्रमुख परेश कुवेसकर यांनी सुद्धा आपली उपस्थिती दाखवून या शिबिराचा लाभ घेतला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर