Breaking News
मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळात रचला इतिहास! बनली 88वी ग्रँडमास्टर
महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या आणि नागपूरच्या मातीने घडवलेल्या एका मराठमोळ्या मुलीने जागतिक बुद्धिबळ पटलावर आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. अवघ्या 19 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने FIDE महिला विश्व बुद्धिबळ कप 2025 चे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत तिने अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला नमवले आणि या विजयासह ती भारताची 88 वी ग्रँडमास्टर बनली आहे. भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रासाठी हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
दिव्या विरुद्ध कोनेरू अंतिम लढत
जॉर्जियातील बातुमी येथे खेळल्या गेलेल्या FIDE विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात काट्याची टक्कर झाली. शनिवार आणि रविवारला झालेल्या क्लासिकल सामन्यांमध्ये कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना बरोबरीत रोखले आणि सामने 1-1 अंकांवर संपले. कोनेरू हंपीने आपल्या अनुभवाचा फायदा घेत दिव्याला आघाडी घेऊ दिली नाही. या सामन्यांमध्ये दोघींची रणनीती आणि संयम यांचा कस लागला. यामुळे प्रेक्षकांना एक रोमांचक लढत पाहायला मिळाली.
रॅपिड राऊंडमध्ये दिव्याचे वर्चस्व
सोमवारी खेळल्या गेलेल्या रॅपिड राऊंडमध्ये नागपूरची 18व्या जागतिक क्रमवारीत असलेली दिव्या देशमुखने पांढऱ्या मोहऱ्यांनी अतिशय आक्रमक सुरुवात केली. मात्र, 5व्या जागतिक क्रमवारीत असलेल्या कोनेरू हम्पीने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना सामना ड्रॉ केला आणि मानसिक आघाडी घेतली. रॅपिड राऊंडच्या दुसऱ्या गेममध्ये काळ्या मोहऱ्यांनी खेळताना दिव्या देशमुख सुरुवातीपासूनच वरचढ राहिली. तज्ञांच्या मते, कोनेरू हम्पीसाठी सुरुवातीला वेळ व्यवस्थापन थोडे कठीण झाले आणि रॅपिड राऊंडच्या दुसऱ्या गेममध्ये त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे