Breaking News
ऐन सणासुदीच्या तोंडावर चणाडाळ महागली
चणाडाळीची आवक घटल्यानं तिचा भाव प्रतिकिलो 80 वरून 120 रुपयांवर पोहोचलाय तर, बेसन पीठाचे दरही 100 वरून 120 रुपये किलो झालेत. आगामी काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.... त्यामुळे श्रावणातल्या सणासुदीमध्ये पुरणपोळी शौकिनांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.. बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर भागांत चणाडाळीची मागणी वाढली आहे.... आगामी सणासुदीचा हंगाम विचारात घेऊन महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी चणाडाळीचा साठा करायला सुरुवात केली आहे... सध्या चणाडाळीचा भाव वाढ झाल्याने व्यापारीवर्ग खूश झाला आहे. मात्र, ग्राहकांना नैवेद्यासाठी पुरणपोळी, तसंच वडा, भजी, ढोकळा असे बेसन पीठाचे विविध पदार्थ बनवताना हात आखडता घ्यावा लागणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar