Breaking News
वरळी येथील विद्यार्थी गुणगौरव समारंभाला उस्फूर्त प्रतिसाद
मुंबई - मुंबई तेलुगु एज्युकेशन सोसायटी, वरळी यांच्या वतीने वरळी येथील गणपतराव कदम शाळेत दहावी, बारावी व पदवीधर विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये तेलुगू समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील भविष्यासाठी विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच नामवंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करिअर बाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही विभागात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या समारंभात जाऊन त्यांना पुढील भविष्यासाठी मार्गदर्शन करत असतो. आम्ही देखील तळागाळातून गरीब परिस्थितीतून आलेला असून आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. यापुढे देखील आम्ही विद्यार्थ्यांसाठी सदैव तत्पर राहून त्यांच्या समस्या सोडवणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिली. यावेळी नवनिर्वाचित आमदार मै समज यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांना देखील काही कानमंत्र दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश मंथेना, शिक्षक वर्ग आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर