Breaking News
10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी
नवी दिल्ली - गृह मंत्रालयांतर्गत कार्यरत इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी वर्षातील सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) पदांसाठी तब्बल 4987 जागा भरण्यात येणार आहेत. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही संधी आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 4987 सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) पदे भरण्यात येणार आहेत.
यामध्ये अनारक्षित (UR)च्या 2471 जागा,इतर मागासवर्ग (OBC)साठी 1015 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): 501 जागा,अनुसूचित जाती (SC): 574 जागा आणि अनुसूचित जमाती (ST)साठी 426 जागा आहेत.
उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून दहावी (मॅट्रिक) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ज्या राज्यातून किंवा केंद्रशासित प्रदेशातून अर्ज केला जात आहे, त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.संबंधित राज्यातील स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान असणे अनिवार्य आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade