Breaking News
ED कडून Myntra विरोधात 1654 कोटींची तक्रार दाखल
मुंबई - ED ने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याद्वारे Myntra आणि त्यांच्या इतर आस्थापनांविरोधातत विरोधात 1654 कोटींची केस दाखल केली आहे. बंगळुरुच्या विभागीय ईडी कार्यलयानं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार Myntra आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून मल्टी ब्रँड रिटेल ट्रेडिंग हे होलसेल कॅश अँड कॅरी ऑपरेशन्स सुरु होतं. थेट परकीय गुंतवणूक धोरणानुसार सध्या मान्य नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीनं कंपनीच्या काही कागदपत्रांची आणि वित्तीय रेकॉर्डसची तपासणी सुरु केली आहे. Myntra नं विदेशी फंड्सचा चुकचा वापर केला की नियम बाजूला ठेवले, याचा शोध घेतला जात आहे. फ्लिपकार्ट Mynra ची पेरेंट कंपनी आहे. पण फ्लिपकार्टनं Myntra ची रचना बदलली नाही. Myntra आजही स्वतंत्रपणे काम करते.
कोणत्या कंपनीनं किंवा व्यक्तीनं विदेशी पैशांचा चुकीचा वापर करु नये, उदा. मनी लाँड्रिंग किंवा कर चोरी. विदेशी गुंतवणूक किंवा व्यापार सोपा होतो. मात्र, फेमा द्वारे विदेशी पैशांच्या देवाण घेवाणीवर नियंत्रण ठेवलं जातं. या कायद्यानुसार ईडीला विदेशी चलन कायदे किंवा नियमांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याची आणि दंड लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
Myntra.com ची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. त्यावेळी गिफ्टची विक्री केली जात होती. त्यानंतर कंपनीनं 2011 मध्ये फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांची विक्री सुरु केली. 2014 मध्ये Myntra ची खरेदी फ्लिपकार्टनं केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar