PM धन धान्य कृषी योजनेला सरकारची मंजुरी
PM धन धान्य कृषी योजनेला सरकारची मंजुरी
नवी दिल्ली - केंद्रीय कॅबिनेटमध्ये पीएम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. 24 हजार रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या, विविध 36 योजनांना एकत्र आणलेल्या पीएम धन-धान्य कृषी योजनेला केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती, केंद्रीय प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या योजनेमुळे देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तत्पूर्वी, यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी या योजनेची घोषणा केली होती. आता, केंद्र सरकारने 2005 पासून पुढील 6 वर्षांसाठी या योजनेस मंजुरी दिली आहे.
पिकांच्या कापणीनंतर साठवण क्षमता वाढविण्याच्या कामात या योजनेचं मोठं योगदान असणार आहे. पेरणीच्या सुविधांमध्येही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असून देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. या योजनेच्या माध्यमातून 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.
पीएम धन धान्य कृषी योजनेअंतर्गत देशाभरातील 100 जिल्ह्यांची निवड केली जाणारं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी आहे, त्यांचा या 100 जिल्ह्यांमध्ये समावेश केला जाईल. शेतीच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या विविध 36 योजनांना एकत्र करून शेतीचा विकास करण्यावर यात भर दिला जाईल. राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना राबवली जाईल. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशभरातल्या एकूण 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणारं आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारं, बी-बियाणे, खत खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाईल. यासोबतच या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल? यावरही काम केलं जाईल.
योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित केलं जाईल. पिकाची साठवणूक तसेच सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच उच्च गुणवत्ता असलेले बी-बियाणे शेतकऱ्यांना पुरवले जातील. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा पुरवठा केला जाईल. सोबतच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी पंप आदी उपकरणं घेण्यासाठीही अर्थसहाय्य केले जाईल. याच योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. ग्रामीण क्षेत्रात रोजगाराची संधी कशी वाढेल, याकडे लक्ष दिले जाईल. यामुळेच आगामी काळात शेती क्षेत्रात बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade