Breaking News
आशियाई एरोबिक्स आणि हिप-हॉप चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी जिंकले १६ सुवर्ण,६ रौप्य पदके आणि १ ट्रॉफी
ठाणे दि : दुबई येथील FISAF – आशियाई एरोबिक्स आणि हिप हॉप चॅम्पियनशिप २०२५ मध्ये नुकत्याच झालेल्या फिटनेस एरोबिक्स आणि स्पोर्ट्स एरोबिक्समध्ये १६ सुवर्ण, ६ रौप्य पदके आणि हिप-हॉप बॅटलमध्ये १ ट्रॉफी जिंकून भारतातील (महाराष्ट्र) सहा उत्साही मुलींनी देशाचे नाव उंचावले.
१ ते ३ जुलै २०२५ रोजी दुबई येथे झालेल्या या स्पर्धेत चमकदार कामगिरीने सांची तावडेने ४ सुवर्ण आणि १ रौप्य पदक, साची पटेलने ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदके, पंथी पोकरने फिटनेस एरोबिक्समध्ये ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदके जिंकली.
तसेच वैयक्तिक क्रीडा एरोबिक्स प्रकारात यज्ञी घाडीगावकरने १ सुवर्णपदक आणि अमूल्या राणेने १ सुवर्णपदक जिंकले आणि अदिती वाल्मिकीने ४ सुवर्ण, १ रौप्य पदक फिटनेस एरोबिक्स आणि हिप हॉप बॅटलमध्ये एक ट्रॉफी जिंकली.
या प्रतिभावान ६ मुलींनी ठाणे येथील श्री माँ विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहे. २०२५ ची दुबई अजिंक्यपद स्पर्धा साध्य करण्यात मुख्य भूमिका प्रशिक्षक रोहिणी गाडगीळ यांची आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar