Breaking News
श्री. विष्णू घुमरे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड
मुंबई - सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व अनुभवी कार्यकर्ते श्री. विष्णू घुमरे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित यांच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.सध्या श्री. घुमरे हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई चे देखील संचालक आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्व कौशल्यामुळे आणि सहकार क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना ही जबाबदारी मिळाल्याचे मानले जात आहे. श्री. घुमरे यांच्या निवडीमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या कार्यामध्ये नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी त्यांना सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant