Breaking News
अल्काराझला नमवून इटलीचा सिन्रर झाला विम्बल्डन विजेता
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या जानिक सिन्नरने विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. सिन्नरने पहिल्यांदाच हे विजेतेपद जिंकले आहे. विम्बल्डन चॅम्पियनशिपचे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा तो पहिला इटालियन खेळाडू बनला आहे.
रविवारी रात्री लंडनमधील ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर झालेल्या ३ तास ४ मिनिटे चाललेल्या सामन्यात इटलीच्या सिन्नरने स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा ४-६, ६-४, ६-४, ६-४ असा पराभव केला.
या विजयासह, सिन्नरने अल्काराझसोबत ५ आठवड्यांचा जुना स्कोअर देखील बरोबरीत आणला आहे. ८ जून २०२५ रोजी, अल्काराझने सिनरला हरवून फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर