Breaking News
स्नेहल क्रीडा मंडळ ( परळ ) वर्ष ५० वे आजआषाढी एकादशी निमित्ताने विभागातून येणार्या प्रत्येक दिंडीचा शाल व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. तसेच सर्व भाविकांना फराळ व केळी वाटप करण्यात आले. मंडळाच्या धार्मिक सेवेस अनुसरून प्रत्येक सदस्य वारकरी दिंडीत सामील झाला आणि या उज्वल अशा वारकरी परंपरेचा भाग बनला. स्नेहलची अभेद अशा एकजुटीची ताकद यात दिसली. मंडळाच्या प्रत्येक सदस्याने यात तन मन धनाने सहकार्य करून हा उपक्रम यशस्वी केला, या उपक्रमासाठी सुवर्णमहोत्सवी वर्षाचे सरचिटणीस श्री प्रदीप खताते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तसेच पंकज चव्हाण, शरद फाटक, अमोल धुरी , नवनीत मालप, शैलेश खापरे, सुशीला बाणे अक्षया धुरी, स्नेहा तावडे, नमिता पंदेरे, अक्षता गवळी, जयवंत मालवणकर, लीनता सावंत, रोहिणी कदम , आणि मंडळाचे सभासद , कार्यकारणी यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!!!!
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant