Breaking News
मुहूर्त ठरला! नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार? समोर आली तारीख!
Navi Mumbai Airport Inauguration Update : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबई विमानतळ सुरू होणार असल्याची चर्चा आहे. परंतु आथा ते कधी कार्यान्वित होणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विमानतळ सुरू करण्यासाठी लागणारी अंतिम तयारी टप्पायत असून लवकरच एका भव्य उद्घाटन सोहळ्याने हे विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू होणार याबाबत राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुंबई विमानतळाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सामंत यांनी नवी मुंबई विमानतळ सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून नवी मुंबई विमानतळाहून व्यवसायिक उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान गेल्या महिन्यात 25 जून रोजी विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही आमदारांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली होती. तेव्हा राहुल कुल यांनी देखील सप्टेंबरपर्यंत विमानतळाचे काम पूर्ण होईल असे सांगितले होते. तसेच नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबतचा अंतिम निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.
बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे, उपनगरीय रेल्वे आणि जलमार्गाची कनेक्टिव्हिटी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हे सध्याच्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी आणि या प्रदेशात हवाई वाहतूक सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हे विमानतळ सप्टेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती आता अधिकृतरित्या समोर आली आहे. या विमानतळाहून मुंबईत सहज पोहोचता येणार आहे. अटल सेतू आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग हे या विमानतळाला मुंबईशी जोडणारे वेगवान मार्ग ठरणार आहेत. या विमानतळाला बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे, उपनगरीय रेल्वे आणि जलमार्गाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, रायगडसह इतर महत्त्वाच्या शहरांना मोठा फायदा होणार आहे.
नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे