राज्यातील सर्व मॉल्सचे होणार फायर ऑडिट
राज्यातील सर्व मॉल्सचे होणार फायर ऑडिट
मुंबई - मॉल्समध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने राज्यात आगीच्या वारंवार होत आहेत. ही आपत्ती रोखण्यासाठी राज्यातील महापालिका क्षेत्रांतील मॉल्सचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली असून सुरक्षा निकष पूर्ण न करणाऱ्या मॉल्सची वीज व पाणी जोडणी तोडण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिला. मॉल्समधील अनियमितता आणि आगीच्या घटना वाढल्याबाबत आमदार कृपाल तुमाने यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मुंबईतील मॉलला लागलेल्या आगीनंतर ७५ मॉलच्या अग्निसुरक्षा तपासणीचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी २६ मॉल्सना नोटीस देण्यात आली होती. केवळ नोटीस देऊन उपयोग नाही, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुंबई महापालिकेने यापूर्वीच सर्व मॉल्सचे फायर ऑडिट केले आहे. ७५ मॉलपैकी ५ ते ६ मॉलवर कडक कारवाई करण्यात आली असून नोटीस दिलेले उर्वरित मॉल बंद आहेत. मात्र यापुढे मॉलमधील अग्निसुरक्षा संदर्भात कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिकांना मॉल्सच्या अग्निसुरक्षा तपासण्यासंदर्भात आदेश आताच देण्यात येतील. यामध्ये सुरक्षा निकष पूर्ण न करणाऱ्या मॉल्सची वीज व पाणी जोडणी तोडण्यात येईल, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant