Breaking News
पंचतंत्राच्या कथांवर आधारित अंमली पदार्थांविषयी जनजागृतीसाठी
ऍनिमेशन फिल्मचे प्रकाशन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते संपन्न
मुंबई - राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन या दोन्ही निमित्तांचे औचित्य साधत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे युवकांमध्ये अंमली पदार्थांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी एक विशेष 4 मिनिटांची अॅनिमेशन फिल्म तयार करण्यात आली आहे. या चित्रफीतीचे औपचारिक प्रकाशन गृह राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या हस्ते मंत्रालय समोरील शासकीय निवासस्थानी पार पडले.
या प्रसंगी नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष व माजी कुलगुरू डॉ. राजन वेलुकर, सरचिटणीस वर्षाताई विलास, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आणि चिटणीस अमोल मडामे उपस्थित होते.
डॉ. राजन वेलुकर यांच्या पुढाकाराने तयार झालेली ही अॅनिमेशन फिल्म पंचतंत्राच्या कथांवर आधारित असून, सोप्या आणि प्रभावी भाषेत युवकांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा सकारात्मक संदेश देते. फिल्मद्वारे व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रभावी जनजागृती साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य गेली अनेक दशके जनजागृती, नशामुक्ती अभियान आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
हा उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि व्यसनमुक्त समाजनिर्माणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर