Breaking News
डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई - माजी नगरपाल डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांचा वाढदिवस दिनांक 7 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघ, ग द आंबेकर मार्ग, भोईवाडा, मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ देखील यावेळी पार पडणार आहे. या कार्यक्रमांमध्ये सदाबहार ऑर्केस्ट्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवर मंडळी तसेच विविध राजकारणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी आपण देखील मोठ्या संख्येने डॉक्टर हेगडे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar