Breaking News
आजपासून ही मनपा महिलांना देणार बस भाड्यात ५०% सवलत
वसई - वसई-विरार महानगरपालिकेने महिलांना आनंदाची बातमी दिली आहे. उद्या १ जूनपासून महिलांना बस भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय वसई-विरार महानगरपालिकेने घेतला आहे. ही योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्याची माहिती वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दिलीय.
वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत एकूण १३० बस चालतात. यापैकी १० बस कंत्राटदारांमार्फत चालवल्या जातात. उर्वरित ४० यस महानगरपालिकेद्वारे चालवल्या जातात. या १३० बस वसई-विरार परिसरातील ३७ प्रमुख मार्गावर धावतात. काही इतर नागरी वाहतूक सेवा महिलांना तिकीट भाड्यात सवलत देत आहेत. महिलांना बसमध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार १ जूनपासून महिलांना अर्ध्या दराने तिकिटे देण्याचा निर्णय घेतलाय, असे अनिल कुमार पवार म्हणाले.
वसई विधानसभा मतदारसंघाच्या कार्यतत्पर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी महिलांसाठी बस प्रवासात ५०% सवलत मिळावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे