कोरोना पेशंटला मारून टाक! सरकारी डॉक्टरचा सहकाऱ्याला फोन,
कोरोना पेशंटला मारून टाक! सरकारी डॉक्टरचा सहकाऱ्याला फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
मुंबई, दि 30: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. २०२० मध्ये कोरोनाच्या महासाथीने जगात जनजीवन ठप्प झालं होतं. ७० लाखांपेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. दरम्यान, या कोरोनाकाळात माणुसकीला आणि डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक घटनाही घडल्या.
अशीच एक घटना लातूरमध्ये घडल्याचं समोर आलंय. लातूरच्या दोन डॉक्टरांमधल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत अशून यामुळे खळबळ उडाली आहे. एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला कोरोना रुग्णाला मारून टाक असं सांगत असल्याचं यात ऐकू येतं.
लातूरच्या उदगीर शहरातील कोरोना सेंटरवरील डॉक्टरांचा हा संवाद आहे. यात उदगीर शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शशिकांत देशपांडे हे सेंटरवर असलेले त्यांचे सहकारी डांगे यांच्याशी बोलत आहेत. दोघांमध्ये चक्क एका कोरोना रुग्णालाय मारून टाकण्याची भाषा करण्यात येतेय. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशिकांत देशपांडे हे पेशंट काढायचं बघ थोडं असं म्हणत ओटू कॉन्स्ट्रेंट रिकामे आहेत का असं विचारतात. यावर डॉक्टर डांगे एकही रिकामे नाही, दोन पेशंट असून एक गाडीत असल्याचं सांगतात. त्यावर देशपांडे म्हणतात की मधे कोणालाच जाऊ देऊ नको, त्या दायमीला मारून टाक. तुला खूप करायची सवय आहे.
देशपांडेंनी असं सांगताच शशिकांत डांगे म्हणतात की रात्रीच ऑक्सिजन कमी केलाय. सगळ्यांना दोन लीटरवर आणलंय. असं सांगताच शशिकांत देशपांडे कमी करा, आमच्याकडे काही मागू नका असं डांगेंना सांगतात.
कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत होता. लातूरमधील अनेक सेंटरवर ऑक्सिजन आवश्यकतेपेक्षा कमी होता. तेव्हा सरकारी रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक असणाऱ्या डॉक्टर शशिकांत देशपांडे यांनी एका रुग्णाला मारून टाकण्यास सांगितल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतंय. या प्रकरणी दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला असून दोघेही फरार असल्याची माहिती समोर येत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Irfan Pathan
- जन्मदिन
- October 27
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar