Breaking News
विदर्भ भूषण हा पुरस्कार माझ्यासाठी आनंदाचा क्षण -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई- विदर्भाचा असल्याचा मला सार्थ अभिमान असून मला विदर्भभूषण पुरस्कार मिळाला हा माझ्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे असे गौरवोद्गार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विदर्भ वैभव मंदिर, विदर्भ समाज संघ मुंबई या संस्थेच्या 28 व्या वर्धापनदिनी केले. ते पुढे म्हणाले गजानन नागे सारखे कार्यकर्ते ज्या संघटनेत असतील ती संघटना मोठी झाल्याशिवाय राहणार नाही. नागे यांचे काम मी फार पूर्वीपासून पाहत आलो आहे. त्यांनी कधीही रागाची भावना न ठेवता निस्वार्थपणे काम केले. विदर्भ वैभव मंदिर या संस्थेने सिडको येथील एक भूखंडासाठी अर्ज केला असून तो भूखंड या संस्थेला मिळण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि हा भूखंड आपल्याला मिळवून देईनच तसेच ठाणे शहरात संस्थेला जागा महापालिके कडून मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही मी याठिकाणी या कार्यक्रमात देतो.
आज खऱ्या अर्थाने विदर्भ बदलतोय विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट येत आहे. रोजगाराच्या विविध संधी आज विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व विदर्भातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. अशी माहिती खासदार अनिल बोंडे यांनी या कार्यक्रमात दिले.
विदर्भातील नागरिकांचे जिवण मान वाढावी तसेच त्यांच्या रोजगारात आणि व्यापारामध्ये त्यांना अनेक संधी मिळाव्यात या दृष्टिकोनातून या स्नेहसंमेलन मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती प्रसिद्ध बिल्डर व्यावसायिक संजय हावरे यांनी दिली. या स्नेहसंमेलन मेळावा उधोगश्री पुरस्कार श्री योगेश पाटील उघोजक ठाणे याना देण्यात आला या कार्यक्रमात अध्यक्ष श्रीयुत पुरूषोत्तम भुयार सचिव श्री उत्तम लोणारकर, निमंत्रक राजेंद्र हटवार, महिला अध्यक्ष माधुरीताई मेंटागे, गजानन गावंडे,प्रमोद तळोकार, प्रभाकर आडेकर, मध्ये विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळेस नागपूर येथील कलावंतनी सुप्रसिद्ध सामाजिक गटार नाटयाचा 112 प्रयोग सादर केला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ छाया जिंतूरकर यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे