Breaking News
अभिनेत्री छाया कदम यांची वन विभागाकडून होणार चौकशी
पर्यावरण
मुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री छाया कदम सध्या वादात अडकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी रानडुक्कर, ससा आणि घोरपडीचं मांस खाल्ल्याचा दावा केला होता. वन कायद्यानुसार संरक्षित प्रजातीच्या वन्य प्राण्यांना मारणं आणि त्यांचं मांस खाणं कायद्यानं गुन्हा मानलं जातं. छाया कदम यांच्या दाव्यानंतर मुंबईतील एक स्वयंसेवी संस्थेनं महाराष्ट्र वन विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीनंतर वन विभाग आता छाया कदम यांची चौकशी करणार आहे. यासाठी वनविभागाकडून विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
सैराट, लापता लेडीज आणि ‘ऑल वुई इमॅजिन अॅज अ लाइट’ या चित्रपटातून छाया यांनी वैशिष्टपूर्ण भूमिका केल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant