Breaking News
बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार…
मुंबई - केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89 व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार तथा कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
32.460 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत यांसारख्या प्रवाश्यांच्या आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टीव्हिटीमध्ये वाढ अपेक्षित आहे.
हा पायाभूत प्रकल्प ‘पीएमजीएस एनएमपी’च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, यामुळे विविध ठिकाणांदरम्यान जोडणी सुधारेल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर