Breaking News
भारतीय रेल्वेकडून ‘जैन विशेष’ यात्रेचे आयोजन
मुंबई - भारतीय रेल्वेकडून सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध यात्रा आयोजित केल्या जातात. रेल्वेने आता जैन समाजाच्या देशभरातील विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी एक विशेष जैन यात्रा आयोजित केली आहे. येत्या ३१ मार्च पासून विशेष भारत गौरव रेल्वेने ही यात्रा सुरु होणार असून त्यासाठी प्रति व्यक्ती २५ हजार रुपये तिकिट आहे.
या रेल्वेची क्षमता ७५० यात्रेकरुंची असून रेल्वेतील विशेष खानपान डब्यातून जैन भोजन दिले जाणार आहेत. या सहलीत भोजन व तीर्थस्थळी जाण्याचा सर्व खर्च या सहलशुल्कात अंतर्भूत करण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथून ही विशेष रेल्वे निघणार असून ती ८ रात्री व नऊ दिवसांचा प्रवास करुन पुन्हा मुंबईला परतेल. या प्रवासात पावापुरी, कुंडलपूर, गुनियाजी, रादूवल्लीका आणि सम्मेद शिखरजी या स्थळांचा समावेश आहे. ही भारत गौरव रेल्वे गाडी पूर्णतः वातानुकूलीत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर