Breaking News
द. कोरियात लढाऊ विमानाने नागरिकांवर टाकले ८ बॉम्ब
सेऊल - दक्षिण कोरियामध्ये एका लढाऊ विमानाने लष्करी सरावादरम्यान चुकून स्वतःच्या नागरिकांवर ८ बॉम्ब टाकले. यामध्ये १५ जण जखमी झाले. २ जण गंभीर जखमी आहेत. हवाई दलाने म्हटले आहे की वैमानिक चुकीच्या ठिकाणी घुसला होता. यामुळे लोक राहत असलेल्या ठिकाणी बॉम्ब पडले. सध्या लष्करी सराव रद्द करण्यात आला आहे. या घटनेत एका चर्चचे आणि एका घराचे नुकसान झाले.
ही घटना आज स्थानिक वेळेनुसार आज सकाळी १० वाजता उत्तर कोरियाच्या सीमेजवळील पोचेओन शहरात घडली. असे मानले जाते की 8 बॉम्बपैकी फक्त एकाच स्फोट झाला. उर्वरित ७ बॉम्ब नि:शस्त्र करण्याचे काम सुरक्षा अधिकारी करत आहेत. दक्षिण कोरियाच्या हवाई दलाने सांगितले की ते या घटनेची चौकशी करत आहेत आणि झालेल्या नुकसानाबद्दल माफी मागितली आहे आणि बाधितांना भरपाई दिली जाईल असे म्हटले आहे. परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
दक्षिण कोरिया आणि अमेरिका १० मार्च ते २० मार्च दरम्यान संयुक्त सराव करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतरचा हा पहिलाच सराव आहे. या सरावा दरम्यानच हा अपघात घडला आहे. दक्षिण कोरियाच्या हवाई दलाने सांगितले की, आम्ही अमेरिकन हवाई दलासोबतच्या संयुक्त सरावापूर्वी सराव करत होतो. या दरम्यान, KF-16 लढाऊ विमानाने चुकून 8 MK-82 बॉम्ब टाकले. लढाऊ विमानांनी टाकलेले बॉम्ब फायरिंग रेंजच्या बाहेर पडले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar