मुंबईकर करणार हवाई प्रवास; पॉड टॅक्सीने जोडली जाणार मेट्रो स्थानके
मुंबईकर करणार हवाई प्रवास; पॉड टॅक्सीने जोडली जाणार मेट्रो स्थानके
महानगर
मुंबई - एमएमआरमधील मेट्रो स्थानके पॉड टॅक्सीने जोडण्यात येणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलनंतर मीरा-भाईंदर पालिका हद्दीत पॉड टॅक्सीची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. भाईंदर पाडा ते विहंग हिल या एक किमीच्या 40 मीटर रस्त्याच्या वरच्या भागातून ही पॉडटॅक्सी धावणार आहे. तर, मीरा-भाईंदर पालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जीपी येथील 60 मीटर रस्त्यावरही चालवली जाणार आहे. या पॉड टॅक्सीचा वेग 60 ते 70 किमी इतका असणार असून एकावेळी 16 प्रवासी जाऊ शकणार आहेत.
एमएमआरमधील मेट्रो स्थानके नजीकच्या रेल्वे स्थानकाला जोडण्यात यावी यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता रोपवेचाही पर्याय राबवला जाणार आहे. एमएमआरमधील मेट्रो स्थानके रोपवेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळं प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.
त्यानुसार एमएमआरमध्ये पॉड टॅक्सीसह रोप वे प्रकल्प राबविण्यासाठी एमएमआरडीएकडून (MMRDA) सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. कोणते मेट्रो स्थानक रोपवे द्वारे तर कोणते मेट्रो स्थानक पॉडटॅक्सीद्वारे जोडता येईल याचा अभ्यास करून आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पॉडटॅक्सी आणि रोपवेचा आराखडा एकत्रितच केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी लागणार असल्याचे म्हणत त्यादृष्टीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सध्या एमएमआरडीएकडून सुरू आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya