Breaking News
एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है….
मुंबई - धारावी अदानींना देण्याचा सत्ताधाऱ्यांचा कट आहे, या काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या आरोपाला भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राहुल गांधी यांचे आरोप पुरावे देत खोडून काढले , एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है असा पलटवार केला आहे. अदानी आणि काँग्रेसचं नातं जुनं आहे, तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात, अदानी समूहाचा मोठा विकास झाला, याकडे तावडे यांनी लक्ष वेधले .
अब्जाधीशांना मुंबईची जमीन हवी असून संपूर्ण राजकीय व्यवस्था एका व्यक्तीच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत केला.धारावीचा विकास तिथे राहणाऱ्यांचे हित लक्षात घेउन करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तर राहुल गांधी यांना धारावीकरांना झोपडपट्टीतच ठेवायचे आहे, म्हणून ते धारावी प्रकल्पाबाबत जनतेची दिशाभूल करत आहे, धारावीकरांना पक्की घरं मिळू नयेत, ही राहुल गांधी यांची इच्छा आहे, असा पलटवार विनोद तावडे यांनी केला. महायुती सरकार धारावीत सगळ्यांना घरं देणार आहे, असं सांगत धारावीची निविदा देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळातच करण्यात आली होती, याकडे तावडे यांनी लक्ष वेधले.
एकही प्रकल्प महायुतीच्या काळात राज्याबाहेर गेलेला नाही असे सांगत तावडे यांनी राहुल गांधी लोकांची फसवणूक करत असल्याची टीका केली. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात महागाई अधिक होती असे सांगत जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारतात महागाई नियंत्रणात राहिली असे तावडे यांनी सांगितले. प्रत्येक जातीला त्यांच्या टक्कीवारीप्रमाणे आरक्षण देण्याची मानसिकता काँग्रेसची आहे त्यामुळेच राहुल गांधी जातनिहाय जनगणना हवी आहे, असे विनोद तावडे म्हणाले. एक है तो सेफ है म्हणजे जाती जातीमध्ये विभागु नका हा नारा सकारात्मक आहे , याकडे तावडे यांनी लक्ष वेधले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे