लाच घेणाऱ्या ED अधिकाऱ्याला अटक
लाच घेणाऱ्या ED अधिकाऱ्याला अटक
जयपूर - सध्या देशभर ED च्या कारवायांची दशहत निर्माण झालेली असताना राजस्थानमध्ये ED च्या नावलौकिकाला धक्का बसेल अशी घटना घडली आहे. एका चिटफंड प्रकरणाता अटक न करण्यासाठी ईडी अधिकाऱ्याने १७लाखांची लाच मागितली होती. यातील १५ लाख रुपये घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. राजस्थान भ्रष्टाचार विरोधी पथकाने म्हणजेच एसीबीने ही कारवाई केली आहे.
राजस्थान एसीबीने ईडीचे अधिकारी नवलकिशोर मीना आणि त्याचा सहकारी बाबूलाल मीना यांना १५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ईडी इंस्पेक्टरच्या अनेक ठिकाणांवर एसीबी कारवाई करत आहे. एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.
राजस्थान सध्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. हे सर्व सुरु असताना राज्यात ईडीकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. मात्र आता ED चा अधिकारीच लाच घेताता रंगेहात पकडल्या गेल्याने राज्यात खळबळ निर्माण झाली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant