Breaking News
भीषण वीज तुटवड्याने कॅरिबियन द्विपसमूहातील या देशात संपूर्ण ब्लॅकआऊट
हवाना - वीज ही आता माणसाची जीवनावश्यक गरज झाली आहे. वीजे शिवाय दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक कामामध्ये अडचणी येऊ शकतात. मात्र कॅरिबियन द्विपसमूहातील क्युबा या देशातील नागरिक गेल्या कित्येक दिवसांपासून वीजे शिवाय राहत आहेत. हा देश सध्या गंभीर वीजसंकटाचा सामना करत आहे.इलेक्ट्रिक ग्रिड बंद झाल्यामुळे देशातील प्रमुख वीजनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेला अँटोनियो गुटेरस वीज निर्मिती प्रकल्प ठप्प झाला. त्यामुळे संपूर्ण देश सर्वात मोठे ब्लॅकआऊट झाले.विजेचा तुटवडा असल्याने सरकारने वीजवापरासाठी कठोर नियम केले आहेत. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
अत्यंत आवश्यक कामे करणाऱ्या कामगारांनीच घराबाहेर पडावे, अशी सूचना सरकारने दिली आहे.संपूर्ण आठवडाभर शाळा बंद ठेवण्यात आल्या. तसेच नाईट क्लब आणि मनोरंजन कार्यक्रम आयोजित करणाऱ्या केंद्रांवर बंदी घातली आहे.क्युबामध्ये मागील कित्येक दिवसांपासून विजेचा तुटवडा आहे.लाखो लोक गेले काही दिवस विजेशिवाय रहात आहेत. क्युबाचे पंतप्रधान मॅन्युअल मार्रेरा क्रुझ यांनी या वीजसंकटाला अमेरिकेने घातलेले आर्थिक निर्बंध जबाबदार आहेत,असा आरोप केला आहे.
हवाना – कॅरिबियन द्विपसमूहातील क्युबा या देशाला सध्या गंभीर वीजसंकटाचा सामना करावा लागत आहे.इलेक्ट्रिक ग्रिड बंद झाल्यामुळे देशातील प्रमुख वीजनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेला अँटोनियो गुटेरस वीज निर्मिती प्रकल्प ठप्प झाला. त्यामुळे संपूर्ण देश सर्वात मोठे ब्लॅकआऊट झाले.विजेचा तुटवडा असल्याने सरकारने वीजवापरासाठी कठोर नियम केले आहेत. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. अत्यंत आवश्यक कामे करणाऱ्या कामगारांनीच घराबाहेर पडावे, अशी सूचना सरकारने दिली आहे.संपूर्ण आठवडाभर शाळा बंद ठेवण्यात आल्या. तसेच नाईट क्लब आणि मनोरंजन कार्यक्रम आयोजित करणाऱ्या केंद्रांवर बंदी घातली आहे.क्युबामध्ये मागील कित्येक दिवसांपासून विजेचा तुटवडा आहे.लाखो लोक गेले काही दिवस विजेशिवाय रहात आहेत. क्युबाचे पंतप्रधान मॅन्युअल मार्रेरा क्रुझ यांनी या वीजसंकटाला अमेरिकेने घातलेले आर्थिक निर्बंध जबाबदार आहेत,असा आरोप केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant