Breaking News
भरधाव ट्रकखाली चिरडून १०० मेंढ्या ठार
खान्देश
नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात कोंडाईबारी घाटात अवघड वळणे आहेत. त्यामुळे या घाटात वारंवार अपघात होतात. येथील अपघात कमी करण्यासाठी अद्याप कोणत्याही उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. आज झालेल्या आपघट्ट मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे. कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला आहे. एक भरधाव ट्रक हा मेंढयांच्या कळपात घुसला आहे. यात १०० मेंढ्या चिरडून ठार झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक ट्रक हा धुळ्याहून सुरतला जात होता. हा ट्रक नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर कोंडाईबारा घाटात आला. यावेळी काही मेंढपाळ हे रस्त्याच्या कडेने कळप घेऊन जात होते. मेंढ्यांचे मालक लखा गोविंदा गोईकर, बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर (रा.विजापूर ता.साक्री जि.धुळे) हे आपल्या शेकडो मेंढ्यांचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरातला जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकवरील चलकांचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक मेंढ्यांच्या कळपात घुसला. यामुळे १०० हून अधिक मेंढ्या चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रक आंध्रप्रदेश राज्याकडून गुजरातला जात होता. तयार रमेश दुगंला (राजू) असे या ट्रकचालकाचे नाव आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE