मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

दिल्लीच्या सीमेवरून सोनम वांगचुक यांच्यासह 120 आंदोलकांना अटक

दिल्लीच्या सीमेवरून सोनम वांगचुक यांच्यासह 120 आंदोलकांना अटक 

नवी दिल्ली - लडाखपासून सुमारे 700 किमी पायी चालून दिल्लीत पोहोचलेले हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुकसह 120 जणांना काल रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी वांगचुक यांना दिल्लीच्या बवाना पोलिस ठाण्यात नेले, तेथे त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, वांगचुक यांना दिल्ली सीमेवर रात्र घालवायची होती. दिल्लीत 5 ऑक्टोबरपर्यंत कलम 163 लागू आहे. मोर्चेकऱ्यांना परत जाण्यास सांगण्यात आले, त्यांनी न ऐकल्यावर कारवाई करण्यात आली.

ताब्यात घेतल्यानंतर वांगचुक यांनी X वर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिले आहे की, म- मला दिल्लीच्या सीमेवर ताब्यात घेण्यात आले आहे. काही लोक म्हणत आहेत की येथे एक हजार पोलीस आहेत. आमच्यासोबत अनेक वडीलधारी मंडळी आहेत. आपल्या नशिबात काय लिहिले आहे ते कळत नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि लोकशाहीची जननी असलेल्या बापूंच्या समाधीकडे आम्ही शांततेत निघालो होतो. हे राम.

वांगचुक यांना वकिलांना भेटू दिले नाही वांगचुक यांच्याशी संबंधित लोकांनी सांगितले की, वांगचुक यांना बवाना पोलिस ठाण्यात वकिलांना भेटू दिले जात नव्हते. त्यामुळे वांगचुक यांच्यासह अन्य समर्थकांनीही उपोषण सुरू केले आहे. या मोर्चासाठी वांगचुक यांनी मोदी आणि अमित शहा यांना ईमेलही पाठवून परवानगी मागितली होती.

त्यानंतर आज सकाळी लडाखचे खासदार हाजी हनीफा हेही वांगचुक यांच्या निषेधात सहभागी होण्यासाठी सिंघू सीमेवर पोहोचले. दिल्ली पोलिसांनीही त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेऊन नरेला पोलीस ठाण्यात पाठवले.

वांगचूक यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर दिल्लीतील वातावरण तापले आहे. आप आणि काँग्रेस पक्षाने यावर जोरदार टिका केली आहे. याबाबत बोलताना दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या,

“पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे उद्या २ ऑक्टोबर रोजी दिल्लीत जाणार होते. मात्र, त्याआधीच त्यांना पोलिसांनी अटक केली. एवढंच नाही तर पोलिसांनी मला देखील सोनम वांगचुक यांना भेटू दिले नाही. ही भारतीय जनता पक्षाची हुकूमशाही आहे. सोनम वांगचुक यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. लडाखमध्ये एलजी राजवट संपली पाहिजे आणि दिल्लीतील एलजी राजवटही संपली पाहिजे. मात्र, लोकांचा अधिकार काढून सर्व अधिकार दिल्लीच्या एलजींना दिले आहेत. आताही मला पूर्ण विश्वास आहे की, या पोलीस अधिकाऱ्यांना एलजी साहेबांचा फोन आला असेल आणि निवडून आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाही सोनम वांगचुक यांना भेटू देऊ नका. मात्र, सोनम वांगचुक यांच्या अटकेची आणि आम्हाला त्यांना भेटू न दिल्याचा निषेध करत आहोत.

लेह ॲपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स गेल्या 4 वर्षांपासून लडाखला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. या संदर्भात एक महिन्यापूर्वी सोनम वांगचुक यांनी सुमारे 120 लोकांसह लेह ते दिल्लीतील बापूंच्या समाधी स्थळापर्यंत पायी मोर्चा काढला. त्यांनी या मोर्चाला दिल्ली चलो असे नाव दिले. सोमवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट