Breaking News
या देशात विवाहपूर्व अनुवांशिक चाचणी बंधनकारक
अबुधाबी -आनुवंशिक आजार हे जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हे आजार पुढील पिढीपर्यंत पोहोचण्याचा धोका किती हे जाणून घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे जगातील विकसित देशांतील सरकार अशा चाचण्या करणे बंधनकारक करत आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) च्या आरोग्य विभागाने ‘विवाहपूर्व अनुवांशिक चाचणी’ अनिवार्य केली आहे. ही 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होत आहे. या नियमानुसार, युएईमध्ये लग्न करण्यापूर्वी जोडप्यांना अनुवांशिक चाचणी करणे बंधनकारक असेल. अबुधाबी सरकारने भावी पिढ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. विवाहापूर्वी जोडप्यांना या चाचण्या कराव्या लागतील, जेणेकरून पालकांचे अनुवांशिक आरोग्य तपासता येईल आणि कोणताही अनुवांशिक विकार मुलांपर्यंत जाऊ नये.
पालकांना एखादा गंभीर अनुवांशिक आजार असेल त्यांच्या मुलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता वाढते. जर ती अनुवांशिक स्थिती दोन्ही पालकांमध्ये असेल, तर मुलाला अनुवांशिक विकार होण्याची शक्यता 50% वाढते. अशा परिस्थितीत, पालकांना याबद्दल आधीच माहिती असणे आवश्यक आहे आणि ते मुलासाठी चांगले नियोजन करू शकतात.
अनुवांशिक विकार शोधण्यासाठी अनेक प्रकारचे स्क्रीनिंग विकसित केले गेले आहे. यामध्ये संपूर्ण ब्लडकाउंट, रक्तगट यासारख्या सामान्य चाचण्याही केल्या जातात. याशिवाय थॅलेसेमिया आणि सिकलसेलची शक्यता शोधण्यासाठी एचबी वेरिएंट चाचणी केली जाते. जगातील अनेक देशांमध्ये यासंबंधीचे नियमही बनवण्यात आले होते, जिथे विवाहापूर्वी अनुवांशिक चाचणी अनिवार्य करण्यात आली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar