महिलेच्या पोटात सापडल्या तब्बल ९ कोटींच्या कोकेनच्या गोळ्या
महिलेच्या पोटात सापडल्या तब्बल ९ कोटींच्या कोकेनच्या गोळ्या
मुंबई - महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकोन ड्रगचे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.या प्रकरणी एका ब्राझीलियन तरुणीला अटक करण्यात आली असून तिच्याकडून कोकेनच्या तब्बल 124 गोळ्या जप्त केल्या आहेत. विचित्र बाब म्हणजे या गोळ्या महिलेच्या पोटात होत्या. मुंबई विमानतळावर विमान लॅण्ड करण्यापूर्वी या महिलेने या गोळ्या गिळल्या होत्या.भारतामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या या महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या या 124 कॅप्सूल्समध्ये असलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तब्बल 9 कोटी 73 लाख रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतामध्ये अमली पदार्थांची तस्करी करण्याच्या उद्देशाने आपण या गोळ्या गिळल्या होत्या आणि त्या शरीरात लपवून भारतात आणण्याचा आपला इरादा होता असं या महिलेने सांगितलं आहे. या महिलेला जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर तिला भायखळ्यातील सरकारी रुग्णालय असलेल्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. “तिने एकूण 124 गोळ्या गिळल्या होत्या. ज्यामध्ये 973 ग्राम कोकेन सापडलं आहे. या कोकेनची किंमत 9.73 कोटी रुपये इतकी आहे. या पदार्थांची चाचणी केली असता ते कोकेन असल्याचं सिद्ध झालं आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार या गोळ्यांमधून रिकव्हर केलेलं कोकेन जप्त करण्यात आलं आहे,” असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणातील तरुणीला अटक करण्यात आली असून तिची चौकशी केली जात आहे. तिच्या चौकशीमधून तिच्यासोबत इतर कोणकोण या रॅकेटमध्ये सक्रीय आहे याची माहिती मिळवण्याचा तपास अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही छापेमारी करण्यात आली. आज ही तरुणी ब्राझीलमधून साओ पावलो विमानतळावरुन मुंबईत येणाऱ्या विमानात असून तिच्याकडे अंमली पदार्थ आहेत अशी गुप्तचरांची माहिती होती. रविवारी या कारवाईसंदर्भातील माहिती, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिली. या महिलेला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता तिने आपल्या पोटात कोकेनच्या गोळ्या असल्याची कबुली दिली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade